बँकिंग क्षेत्रातील अधिकारी
कु. अपेक्षा सुग्रीव शेळके
बँक ऑफ बडोदा येथे अधिकारी
पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगावच्या माजी विद्यार्थीनी कु. अपेक्षा सुग्रीव शेळके आज बँक ऑफ बडोदा मध्ये अधिकारी पदावर यशस्वीपणे कार्यरत असून आपल्या शाळेचे नाव अभिमानाने उज्ज्वल करत आहेत.
छोट्याशा गावातील साधारण परिस्थितीतून शिक्षण घेताना आर्थिक अडचणी आणि परिस्थितीची बंधने पार करत त्यांनी आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करण्याचा ध्यास जपला.
जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःच्या पायावर उभे राहून त्यांनी मुलींसाठी प्रेरणादायी ओळख निर्माण केली आहे.